BMC Election : उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं

BMC Election : उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं

| Updated on: Jan 09, 2026 | 2:21 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला मराठी माणसाला हिंदू मानत नसल्याचा प्रश्न केला, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वाबद्दल विचारणा केली. यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत, असे म्हणत लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या कथित घटनांचा उल्लेख केला.

भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत, हे सांगावे अशी मागणीही ठाकरे यांनी केली होती. या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत आहे. लोक हिंदुत्वाचा विचार करतील आणि १६ तारखेला सर्व भगवमय करतील. मुंबईचा महापौर मराठी होईल असे ठाकरे म्हणतात, तर भाजप मुंबईचा महापौर हिंदू होईल असे म्हणते. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, असा प्रश्न पुन्हा विचारला.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठी आणि हिंदू म्हणजे काय हे स्पष्ट करावे, कारण मराठी हा हिंदूच आहे असेही ते म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मराठी माणसांवर गोळ्या घालणारे मोरारजी देसाई हिंदू होते की नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर नितेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी हिरवा गुलाल उडवल्याचा, सर तन से जुदा आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा आरोप केला. महाराष्ट्राची, मुंबईची आणि महापालिकेच्या शहरांमधील जनता हे विसरलेली नाही. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत, तर काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लीगला मत असे राणे यांनी म्हटले आहे. हा वाद आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरत आहे.

Published on: Jan 09, 2026 02:21 PM