Gauri Garje Death Case: संशयास्पद मृत्यूनंतर डॉ. गौरीचं पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात… गर्जे अन् पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची, एकच मागणी
डॉ. गौरी गर्जे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी मोहोज देवढे येथे पोहोचले आहे. पती अनंत गर्जे यांच्या घरासमोरच गौरीचे अंत्यसंस्कार करण्याची मागणी माहेरच्या मंडळींनी केल्यामुळे गर्जे आणि पालवे कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली आहे.
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांना डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, डॉ. गौरी गर्जे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी मोहोज देवढे येथे पोहोचले आहे. गौरीचे अंत्यसंस्कार पती अनंत गर्जे यांच्या घरासमोरच करावेत, अशी मागणी माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे. या मागणीवरून गर्जे आणि पालवे या दोन्ही कुटुंबीयांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. या घटनेमुळे मोहोज देवढे गावात प्रचंड तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.
