Pankaja Munde PA Wife Death : माझं लेकरू गेलं आता मी… गौरी पालवेच्या आत्महत्येनंतर वडील ढसाढसा रडले, हतबल होत म्हणाले…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत वरळी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने एक धक्कादायक वळण घेतले आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला असून, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनंत आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. गौरीच्या आई-वडिलांसह कुटुंबीय सध्या तीव्र दुःखात असून, त्यांनी पोलिसांकडे न्याय मागितला आहे. गौरीचे वडील स्वतः डॉक्टर असून, आई नर्स आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गौरीसोबत मागील काही महिन्यांपासून अनंत गर्जे यांच्याकडून मारहाण होत होती आणि त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. या संदर्भात गौरीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. यामुळे कुटुंबीय तिच्या मृत्यूमागे हत्येचा संशय व्यक्त करत आहेत.
Published on: Nov 23, 2025 12:54 PM
