मुंबई महापालिकेत देशांतील सर्वात मोठा घोटाळा; भाजप आमदार अमित साटम यांचे गंभीर आरोप

| Updated on: Aug 23, 2022 | 9:59 PM

मुंबई महानगरपालिकेत 3 लाख कोटींचा घोटाळा(biggest scam in the Mumbai Municipal Corporation) झालाय असं साटम म्हणाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अमित साटम यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत.  मुंबई पालिकेमध्ये आयुक्तांच्या रूपामध्ये एक वाजे बसलेला आहे असेही आमदार साटम म्हणाले. 1997 ते 2022  या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये या देशांमध्ये झालेल्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालाय

Follow us on

मुंबई : देशातील सगळ्यात मोठा घोटाळा मुंबई महापालिकेत झाला असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार अमित साटम( BJP MLA Amit Satam ) यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेत 3 लाख कोटींचा घोटाळा(biggest scam in the Mumbai Municipal Corporation) झालाय असं साटम म्हणाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अमित साटम यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत.  मुंबई पालिकेमध्ये आयुक्तांच्या रूपामध्ये एक वाजे बसलेला आहे असेही आमदार साटम म्हणाले. 1997 ते 2022  या कालावधीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये या देशांमध्ये झालेल्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. सर्वच गोष्टीत हा घोटाळा झालाय. अगदी कोरोना काळात लोक दोन दोन हजार रुपयांच्या रेमिडीस वीर साठी फिरत होते. त्यावेळेला यांनी कोविडमध्ये सुद्धा तीन हजार कोटीचा घोटाळा केला. गेल्या दोन वर्षांमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय. या ठिकाणी पण एक सचिन वाझे महानगरपालिकेच्या आयुक्तच्या रूपामध्ये वाजेगिरी करत आहे.  या मुंबईच्या महानगरपालिकेच्या कमिशनच्या ऑफिसमध्ये कोण कोण येतं चेक करा संध्याकाळी सहा आणि रात्री नऊच्या मध्ये कोण कोण येते ते तपासा असं म्हणत साटम यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत.