गोचीड vs झाकणझुल्या, आरोप करताना नेते घसरले, कुणी कोणाचा निधी पळवला? सत्ताधाऱ्यांमध्येच संभ्रम?

गोचीड vs झाकणझुल्या, आरोप करताना नेते घसरले, कुणी कोणाचा निधी पळवला? सत्ताधाऱ्यांमध्येच संभ्रम?

| Updated on: May 31, 2025 | 10:37 AM

अजित पवारांनी निधी पळवला यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेवरून पुन्हा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांना निधी वळवू देऊ नका अशी विनंती हाके यांनी फडणवीसांना केली आहे. मात्र निधी वळवल्याचे सर्व आरोप फडणवीसांनी फेटाळून लावले आहेत.

निधी वाटपावरून एक तर सत्ताधारी संभ्रमात आहेत किंवा मग सत्ताधारी संभ्रम वाढवत असल्याचे चित्र दिसतेय. धनगर समाजाच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचे पत्र गोपीचंद पडळकर फडणवीसांना लिहिणार आहेत. मात्र असा कोणताही निधी वळवला नसल्याचं भाजपचे मंत्री गिरीश महाजन सांगतायत. जेव्हा नव्या सरकारमध्ये अजित पवारांना पुन्हा अर्थ खाते दिलं गेलं तेव्हा प्रत्येक फाईल आणि निर्णय फडणवीसांच्या संमतीशिवाय होणार नसल्याचं नेत्यांकडून सांगण्यात आलं. मात्र आता तेच भाजपचे पडळकर निधी रोखल्याची तक्रार करतायत. दुसरीकडे विधानसभेत भाजपला समर्थन देणारे लक्ष्मण हाकेंनी तोच आरोप केलाय.

पाच दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाच्या निधीतून काही पैसा लाडक्या बहिणींना दिला गेल्याच्या बातम्या समोर आल्या. या बातमीला भाजपचे मंत्री बावनकुळेनी खोट ठरवलं. दुसरीकडे तात्पुरता निधी वळवला असेल तर पुन्हा देऊ असे भाजपचेच मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. आणि भाजपचेच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी निधी वळवल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. सत्तेतल्याच तीन मंत्र्यांनी तीन वेगवेगळी उत्तर दिली. यानंतर पुन्हा आदिवासी विभागांतून लाडक्या बहिणींना पैसा वळवल्याची बातमी आली. त्यावर भाजपचे मंत्री बावनकुळेनी पुन्हा या बातमीला खोटं ठरवत आदिवासी विभागाच्या निधीला हातच लावता येत नसल्याचं सांगितलं.

Published on: May 31, 2025 10:37 AM