BJP :  खडसे भिक्कार XXX नेता… भाजप आमदाराचा सयंम सुटला अन् ऑन कॅमेरा केली शिवीगाळ

BJP : खडसे भिक्कार XXX नेता… भाजप आमदाराचा सयंम सुटला अन् ऑन कॅमेरा केली शिवीगाळ

| Updated on: Jul 25, 2025 | 4:30 PM

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या बड्या नेत्यांच्या वादात भाजपच्या एका आमदाराने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याची पाहायला मिळाली आहे.

जळगावातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे तीनही बडे नेते सातत्याने चर्चेत असतात. मात्र आता भाजपचा एक आमदार चांगलाच चर्चेत आलाय. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांनी चक्क ऑन कॅमेऱ्या शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. मंत्री गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंकडून करण्यात येणाऱ्या आरोपावरून आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ खडसे मातब्बर नव्हे तर भिxxxx नेता असल्याचे म्हणत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी यांनी जिव्हारी लागणारी टीका केली. इतकंच नाहीतर एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त आहेत. ते महाजनांची बरोबरी करूच शकत नाही’, असेही मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय. ‘एकनाथ खडसेंविरोधात आम्ही पत्रकार परिषद घेऊ, यावेळी आम्ही त्यांचा बुरखा फाडू, असा इशारा या आमदाराने दिला.

Published on: Jul 25, 2025 04:21 PM