विनायक राऊत चायनिज मॉडेल, भाजपच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका काय?

विनायक राऊत चायनिज मॉडेल, भाजपच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका काय?

| Updated on: Jan 12, 2024 | 6:12 PM

महायुतीचाच उमेदवार निवडून येणार. तिथे आऊटेड माल आहे. विनायक राऊत नावाचा चायनिज मॉडेल आहे. आमच्याकडे ओरिजनल उमेदवारांची रांग लागली आहे, असे म्हणत भाजपचे आमदार नेत्यानं केली खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका

सिंधुदुर्ग, १२ जानेवारी २०२४ : आमच्याकडे उमेदवारांची भाऊ गर्दी आहे. इकडे महायुतीचाच उमेदवार निवडून येणार. तिथे आऊटेड माल आहे. विनायक राऊत नावाचा चायनिज मॉडेल आहे. आमच्याकडे ओरिजनल उमेदवारांची रांग लागली आहे, असे म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते मंडळी काय ठरवतील, ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि महायुतीचा खासदार असणार मग तो कुठच्याही पक्षाचा महायुतीच्या मित्र पक्षाचा खासदार असणार. कारण आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघात गेली दहा वर्षं विनायक राऊत नावाचा कलंक, काळा ढब्बा लागला आहे. तो 2024 ला पुसून टाकायचा आहे. असा निर्धार आमच्या या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 12, 2024 06:12 PM