Parinay Phuke : त्यामुळं शिवसेनेचा बाप मीच… भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य अन् शिंदेसेना खवळली

Parinay Phuke : त्यामुळं शिवसेनेचा बाप मीच… भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य अन् शिंदेसेना खवळली

| Updated on: Aug 04, 2025 | 2:55 PM

माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु त्यादिवशी माझ्या चांगले लक्षात आले, शिवसेनेचा बाप मीच आहे, असं परिणय फुके म्हणालेत.

शिवसेनेचा बाप मीच, असं म्हणत भाजप आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, भाजप आमदार परिणय फुके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या या वक्तव्यानंतर मोठा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिणय फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देणार, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भर पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.

‘जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट केले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला माहित झालंय, शिवसेनेचा बाप मीच आहे. कारण खापर माझ्यावर फोडलं जात आहे.’, असं वक्तव्य भाजप आमदार परिणय फुके यांनी केलंय.

Published on: Aug 04, 2025 02:55 PM