Suresh Dhas : ‘…हे अतिशय भयानक, गरिब माणसांनी जगायचं कसं?’ रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून सुरेश धसांचा संताप
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भिसे यांच्या गर्भवती पत्नीला दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दिनानाथ रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केली होती, यावरूनच भाजप आमदार आक्रमक झालेत.
‘दवाखान्याची बीलं हे अमर्याद होतायतं, रूग्णालयाची लाखो रूपयांची बीलं काढली जातायंत हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. गरिब माणसाला आजारी पडावं की नाही… असा विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.’, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घडलेल्या घटनेनंतर दिली. विधानसभेत वाढत्या बीलाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही रूग्णालयाची एवढी मुजरी कशामुळे चालते हे पाहावे लागेल. आमदारांच्या घरातल्याच व्यक्तीचं असा मृत्यू होत असेल तर हे दुर्दैव असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आणि पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूवर खंत व्यक्त केली. धस पुढे असेही म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या स्वतंत्र समिती योग्य कारवाई करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे फोन पण जर रूग्णालय प्रशासन घेत नसेल तर यांची एवढी मुजोरी कशामुळे सुरूये? असा प्रश्न आहे. पण आजपर्यंत आम्ही गप्प होतो, परंतु आमच्याच मंत्र्यांच्या पीए सोबत अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आता कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी सुरेश धस यांनी केली.
