Suresh Dhas Video : “महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये…”, सुरेश धस यांचा पुन्हा हल्लाबोल

Suresh Dhas Video : “महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये…”, सुरेश धस यांचा पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Jan 27, 2025 | 5:51 PM

महादेव मुंडे यांची हत्या ऑक्टोबर 2023 मध्ये झाली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपास संदर्भामध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी डी वाय एसपीची भेट घेतली आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले.

महादेव मुंडे यांची हत्या ऑक्टोबर 2023 मध्ये झाली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपास संदर्भामध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी डी वाय एसपीची भेट घेतली आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले. “महादेव मुंडेचे आरोपी 15 दिवसात जेलमध्ये गेले पाहिजेत”, असं म्हणत सुरेश धस पुन्हा एकदा कडाडले. इतकंच नाहीतर पोलीस प्रशासनावरही त्यांनी हल्लाबोल केला. “आकाचे पोलीस दलातील जे प्रेमी आहेत. आतापर्यंत एसपींना पोलीस दलातच कसं ठेवलं. मी कितीतरी वेळा याबद्दल बोललोय. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या DYSP यांनी देखील अजून चार्ज घेतलेला नाही. DYSP देखील आकाचेच आहेत. महादेव मुंडेचे आरोपी सापडले पाहिजेत. ते 15 दिवसाच्या आत जेलमध्ये गेले पाहिजे. त्याची हत्या होऊन १५ महिने झाले. अतिशय निर्घृण हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आलं. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही”, असेही सुरेश धस यांनी म्हणत एकच घणाघात केला.

Published on: Jan 27, 2025 05:51 PM