Narayan Rane : राणेंविरोधात दंड थोपटले अन् राणे म्हणाले… महाजनांमध्ये काय दम, त्यांची इच्छा असल्यास…
प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आज आंदोलन केली असून नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर राणेंनीही त्यावर पलटवार केलाय
मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे राणे पिता-पुत्र यांच्यातील वाद सध्या चांगलाच टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. प्रकाश महाजनांची इच्छा असल्यास ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय. तर महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन. तर प्रकाश महाजनांना मी महत्त्व देत नाही, असंही नारायण राणे म्हणाले. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी पलटवार केलाय. दरम्यान, ‘नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला. मी इथेच तुमची वाट बघतोय’, असं आव्हान प्रकाश महाजन यांनी राणेंनी दिलाय. तर आमच्या विरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन अशी धमकी राणे देत असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. राणेंनी धमकी दिली असल्याचा आरोप करत संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार प्रकाश महाजन यांनी केला.
Published on: Jun 10, 2025 04:46 PM
