Shiv Sena UBT : नाशिकमधील BJP पदाधिकारी अन् कार्यकर्ते भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळले! ठाकरेंच्या शिवसेनेत घेतला प्रवेश
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप सरकारच्या शेतकरी-कष्टकरी विरोधी धोरणांना कंटाळून आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. गायकवाड कुटुंबासह अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आज उत्साहात दाखल झाले. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून आणि महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी यांच्या वाट लागल्याच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याची माहिती मिळतेय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला खंबीरपणे पाठिंबा देण्यासाठी त्यांनी शिवबंधन बांधले. या प्रवेश सोहळ्यात गायकवाड कुटुंबातील सदस्यांसह प्रा. डॉ. लक्ष्मण सुरेश शेंडगे, वैभवी घाडगे, बबिता मोरे, हिमाया ताई बागुल, सीमा ललवाणी, अंकुश आणि रोहिणी उखाडे यांसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
सातपूरमधून भाजपचा एक मोठा गटही शिवसेनेत सहभागी झाला, ज्यांनी कोणतीही तिकीट किंवा पदाची अपेक्षा न ठेवता केवळ पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संगीता ताई गायकवाड यांनी ‘मातोश्री’वर प्रवेश करताना अभिमान व्यक्त करत, शेवटपर्यंत पक्षासाठी काम करण्याची ग्वाही दिली. ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
