‘मोदीची गॅरंटी संकल्प’ पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी नेमकं काय?

| Updated on: Apr 16, 2024 | 10:57 AM

भाजपने या जाहीरनाम्याला मोदीची गॅरंटी संकल्प पत्र असं नाव दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपने मोठी आश्वासनं दिलीत. भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी नेमकं काय?

Follow us on

भाजपने लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. भाजपने या जाहीरनाम्याला मोदीची गॅरंटी संकल्प पत्र असं नाव दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपने मोठी आश्वासनं दिलीत. दरम्यान, भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर विरोधकांनी मात्र चांगलंच टीकास्त्र डागलंय. पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत रेशन, पाणी आणि गॅस जोडणी, पंतप्रधान सौर घर योजनेतून नागरिकांचं वीज बिल शून्यावर आणणार, आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाख रूपयापर्यंतचे मोफत उपचार, मध्यमवर्गीय कुटुंबीयांना पक्की घरं बांधून देणार, पेपरफुटीवर मोठा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार, २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भारताकडे असणार, पर्यटनाच्या माध्यमातून तरूणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार, १ कोटी बहिणी लखपती दीदी, आणखी ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार, नारी वंदन अधिनियम लागू करणार…..आणखी काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात….