Chatrapati Sambhajiraje | आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा मिळवण्याकरीता माझ्याकडे 2 पर्याय, ऐका काय ?

Chatrapati Sambhajiraje | आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा मिळवण्याकरीता माझ्याकडे 2 पर्याय, ऐका काय ?

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 8:31 PM

समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरू राहील. ओबीसी समाजाला सोबत घेऊन आम्ही काम करतोय. ओबोसीचे अनेक नेते मला भेटले, आमच्याकडे कधी लक्ष देणार असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे यांनी आज राज्यसभेत मांडला. समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरू राहील. ओबीसी समाजाला सोबत घेऊन आम्ही काम करतोय. ओबोसीचे अनेक नेते मला भेटले, आमच्याकडे कधी लक्ष देणार असेही ते म्हणाले. आम्ही सर्व एकच आहोत. मी दोन तीन अमेडमेन्ट सुचवले आहे. हा पहिला टप्पा आहे आरक्षण मिळवून देण्याचा. 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये एसईबीसीमध्ये आरक्षण देता येईल. या विधेयकाचे स्वागतच आहे. केंद्र आणि राज्यसरकारची जबाबदारी आहे. प्रीतम मुंडेचं वक्तव्य विरोधात्मक आहे. ओबीसी आणि मराठा आणि इतर जाती एकाच छताखाली राहतात. त्यांचं वक्तव्य 127 व्या घटना दुरुस्तीशी संबंधित नाही, असे यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले.