Chandrakant Patil | कोणताही कार्यकर्ता असू दे, चूक माफ केली जाणार नाही : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 02, 2021 | 9:53 AM

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहेत. चौकशीनंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीला माफी नाही, असं देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले.

Follow us on

मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीवेळी ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज अगदी सकाळी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना चुकीला माफी नाही, असं म्हटलं.