Donald Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ‘ब्लॅक मंडे’, ट्रॅम्प टॅरिपमुळं नेमकं नुकसान कशाचं?
भारतासह इतर देशांमध्ये शेअर बाजारात पडझड झाली आहे तेही पाहूयात. हॉंगकांगमध्ये 8.7 टक्क्यांची पडझड झाली आहे. तर जपानमध्ये सुद्धा 8 टक्के पडझड झाली आहे. सिंगापूरमध्ये 7.1 टक्के, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 टक्के, अमेरिकेत 6.1 टक्के, दक्षिण कोरियात 5.5 टक्के, चीनमध्ये 12 टक्के, तर भारतात 4.25 टक्के आणि तैवानमध्ये 11 टक्क्यांची शेअर बाजारात पडझड झाली आहे.
जगभरातील देशांवर अमेरिकेने टॅरिफ लावलं. अमेरिकेन चीनवर 34%, तर चीनने सुद्धा अमेरिकेवर 34% टॅरिफ लावला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध यामुळे सुरू झाले आहे. या व्यापार युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार माजलेला आहे. सेन्सेक्स 2 हजार 800 अंकांची तर निफ्टीमध्ये 900 अंकांची घसरण झाली. निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारामध्ये ही मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजारात मोठ्या घसरणीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे मूल्य झपाट्याने कमी झाले आहे. गुंतवणूकदारांचा काही लाख कोटींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत सुद्धा अनिश्चितता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. व्याजदराबाबतची अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बाजारात घसरण झाली आहे.
