BMC Election : उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

BMC Election : उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

राखी राजपूत | Updated on: Jan 14, 2026 | 3:46 PM

महाराष्ट्र पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूरसह अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप झाले आहेत. यातून भाजप-शिवसेना संघर्ष, जळगावात मोठ्या रकमेची जप्ती आणि नवी मुंबईत अफवा पसरल्याचे चित्र आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

महाराष्ट्र पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी राज्यभरात अनेक ठिकाणी पैसे वाटप, राजकीय संघर्ष आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून हाणामारी झाली, ज्यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी दोन उमेदवारांना ताब्यात घेऊन त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने मूक मोर्चा काढला.

जळगावात स्थिर सर्वेक्षण पथकाने एका कारमधून 29 लाख रुपये रोख, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोने जप्त केले. चेंबूरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेवर पैसे वाटपाचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला, तर नागपूरमध्ये काँग्रेसने भाजपवर काँग्रेसने दिया धोका पोस्टरच्या आड पैसे वाटपाचा आरोप केला. नवी मुंबईतील वाशी येथे मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याची अफवा पसरली होती, जी नंतर निराधार ठरली. अमरावतीतही पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद तापला आहे. पोलिसांनी सर्व संवेदनशील भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Published on: Jan 14, 2026 03:45 PM