Breaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस

| Updated on: Jun 15, 2021 | 4:59 PM

मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना आता पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देतांना त्यावर पारपत्राचा क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. जर पहिला डोस घेते वेळी पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल तर लसीकरण अधिकाऱ्यांना केवळ पारपत्राचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र देता येईल.लसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांसाठीच्या लसीकरणाचा नमुना फॉर्म भरुन घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्ड लस आपातकालिन वापरासाठी मान्य केल्यानं लसीकरण प्रमाणपत्रात या कोविशील्ड लसीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहिल.