Breaking | समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्धाटन सोहळा पुढे ढकलला

Breaking | समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्धाटन सोहळा पुढे ढकलला

| Updated on: Apr 25, 2022 | 11:59 AM

समृद्धी महामार्गाचं (Nagpur Samruddhi Highway) उद्घाटन दोन मे रोजी होणार होतं. पहिल्या टप्प्यांचं उद्घाटनं दोन मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला असलाची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन मे रोजी होणार होणार उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आलं असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गाचं (Nagpur Samruddhi Highway) उद्घाटन दोन मे रोजी होणार होतं. पहिल्या टप्प्यांचं उद्घाटनं दोन मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला असलाची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन मे रोजी होणार होणार उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आलं असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता 2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार नाही. कोणत्या कारणामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं असून आता समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केव्हा होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. नागपूर-वाशिम (Nagpur-Washim) 210 किलोमीटरचा पहिला टप्पा दोन तारखेला सुरु होणार होता. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची सुरुवात होणार होती. मात्र आता या पहिल्या टप्प्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.