मुंबईची केली लूट, अर्थसंकल्पातून भरून द्या तूट; अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कुणाची ही मागणी?

| Updated on: Feb 01, 2023 | 11:11 AM

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्र सरकारवर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांचा जोरदार निशाणा, अर्थसंकल्पातून मुंबईची तूट भरून देण्याची केली मागणी

Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देश लुटला जातोय. कुणाचं नाव घेत नाही. त्या लुटीच्या पैशात मुंबईचाही पैसा आहे. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसुल हा मुंबईतून दिला जातो. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. या बजेटनं काही भरपाई केली तर केंद्राचे आभारी राहू. तिजोरीतील हा पैसा आणि अर्थसंकल्प भाजपचं नसून जनतेचं आहे, असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आजही केंद्र सरकारच्या तिजोरीतील मोठा वाटा हा महाराष्ट्र, मुंबईकडून जातो. अशावेळी मुंबईसाठी अनेक प्रकल्प आज अर्धवट अवस्थेत असून त्यांना केंद्राची गरज आहे. त्याबाबत आम्ही पत्र दिली आहेत. सरकार बदललं असलं तरी आम्ही जी काही कामं सुटवली आहे. त्यावर अर्थमंत्री विचार करतील अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.