Buldhana : धक्कादायक… रद्दी पेपरवर विद्यार्थ्यांना पोषण आहार, ZP च्या शाळेत चाललंय काय?
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील एका जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना स्टीलच्या ताटांऐवजी रद्दी कागदावर पोषण आहार दिला जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आधीच जिल्हा परिषद शाळेची पट संख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे .. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून शालेय पोषण आहार देण्यासाठी मोठी नियमावली शासनाने तयार केली आहे.. मात्र नियमावली धाब्यावर बसवून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शाळा प्रशासन करत आहे.. प्राथमिक शाळेतील मुलांना सकस पोषण आहार देताना मोठी काळजी घेण्याच्या सूचना असताना ही या मुलांना चक्क रद्दी पेपर वर खिचडी दिल्या जात आहे.. तर मुलं पोषण आहार घेत असताना चक्क श्वान त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत.
