शिवसैनिकांकडून आता घेतले जाणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

| Updated on: Jul 02, 2022 | 9:22 AM

शिवसैनिकांना आता एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र सादार करावे लागणार आहे. शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे.

Follow us on

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेच्या एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेनेकडून सावध पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांना एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठी  ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे.