Chandrakant Patil | तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? – चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 17, 2021 | 4:48 PM

मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.

Follow us on

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत बुधवारी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर तसेच मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? असा सवाल करतानाच या देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे.

तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी प्रतिक्रिया देत सार्थी संस्थेला आणखी बळकट करण्याची गरज असल्याचही चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. विशेष अधिवेशनात आरक्षणावर सांगोपांग चर्चा करता येईल. आमदारांना आपली मते आणि काही फॉर्म्युले देता येतील. त्यातून चांगला मार्ग निघू शकतो. रुटीन अधिवेशनात केवळ तीन साडेतीन तास चर्चा होते. त्यातून काही निष्पन्न होत नाही, सर्वांना बोलताही येत नाही, असं सांगतानाच विशेष अधिवेशन मागता मागता रुटीन आरक्षण आलं आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. निवडणूक घोषित झाली की बसून ठरवू, असं ते म्हणाले