Chandrakant Patil : मुंबई तोडण्याची ताकद कोणात नाही, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

Chandrakant Patil : मुंबई तोडण्याची ताकद कोणात नाही, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Jul 06, 2025 | 3:16 PM

Chandrakant Patil Slams Thackeray Brothers : ठाकरे बंधूंनी काल मेळाव्यातून केलेल्या टीकेवर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणात नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच हा मुद्दा सांगितला होता. मुंबई कशाला कोण तोडतंय, अशी आक्रमक प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुंबई कोण तोडणार? आम्ही का मेलो आहोत? असंही त्यांनी म्हंटलं आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आठवले नाहीत, अगदी राज ठाकरे यांचा मुलगा विधानसभेत असतानाही त्यांना आठवण झाली नाही. आता राजकीय सोयीस्करपणामुळे त्यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतले आहे. मात्र, ही जवळीक किती काळ टिकेल, निवडणुकीपर्यंत टिकेल की त्यापूर्वीच वेगळी होईल, हे सांगणे कठीण आहे, असेही पाटील म्हणाले.

काल मुंबईतील एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण झाले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. याला प्रत्युत्तर देताना भाजपने आता आपली भूमिका मांडली आहे.

Published on: Jul 06, 2025 03:16 PM