BJP vs Shivsena UBT : अ‍ॅनाकोंडाच्या टीकेला अजगरानं प्रत्युत्तर, भाजपा-ठाकरेंचा एकमेकांवर हल्लाबोल; नेमकं काय चाललंय?

BJP vs Shivsena UBT : अ‍ॅनाकोंडाच्या टीकेला अजगरानं प्रत्युत्तर, भाजपा-ठाकरेंचा एकमेकांवर हल्लाबोल; नेमकं काय चाललंय?

| Updated on: Oct 28, 2025 | 3:08 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना अजगर संबोधले आहे. मुंबईला गिळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत त्यांनी ठाकरे यांच्यावर पक्षाला, शिवसैनिकांना आणि हिंदुत्वाला गिळंकृत केल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत निवडणूक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली होती, तसेच अमित शहांवरही टीका केली होती.

भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच ईव्हीएमवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या निवडणूक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच, त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरही गंभीर टीका केली. यावर पलटवार करताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः अजगर म्हटले आहे.

बावनकुळे यांनी सामनामधील बातमीचा संदर्भ देत म्हटले की, जर कोणी मुंबईला गिळण्याचा प्रयत्न करत असेल तर ते यशस्वी होणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंवर चुकीच्या वागणुकीमुळे पक्ष, शिवसैनिक आणि हिंदुत्व गिळंकृत केल्याचा आरोप केला. बावनकुळे यांच्या मते, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून बोलत आहेत, कारण त्यांना आता राज्यात फारसा वाव राहिलेला नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त स्वतःच्या आणि मुलाच्या मंत्रिपदापलीकडे काहीही केले नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

Published on: Oct 28, 2025 03:08 PM