Sarangkheda Chetak Festival: पांढरा शुभ्र, उंची बघाल तर… अश्वांच्या पंढरीत 21 लाखांच्या ‘बाबा’ची क्रेझ, सारंगखेड्याच्या घोडे बाजारात यंदा कुणाची चर्चा?
नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक महोत्सवात 21 लाख रुपयांच्या बाबा घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चार वर्षांच्या या शुभ्र घोड्याची उंची 61 इंच आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात सध्या 21 लाख रुपयांच्या बाबा घोड्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अश्वांच्या या पंढरीत हा पांढरा शुभ्र घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षांच्या या घोड्याची उंची 61 इंच असून, त्याच्या शरीरावर एकही काळा डाग नाही. कमी वयात अधिक उंची असल्याने त्याची किंमत अधिक असल्याचे सांगितले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे अश्वशौकिनांसाठी पर्वणी असलेल्या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात झाली आहे. अठराव्या शतकापासून, म्हणजेच जवळपास चारशे वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे. तापी नदीच्या काठावर भरणाऱ्या या यात्रेत देशभरातून जातिवंत घोडे दाखल होतात, ज्यात मारवाडी, काठियावाडी, नुकरा आणि पंजाबी वंशाच्या घोड्यांचा समावेश असतो.
Published on: Dec 05, 2025 04:51 PM
