“रामदास आठवले यांना भेटणार, कोणतं पद मिळणार यावर चर्चा करणार”, छगन भुजबळ यांचा टोला

“रामदास आठवले यांना भेटणार, कोणतं पद मिळणार यावर चर्चा करणार”, छगन भुजबळ यांचा टोला

| Updated on: Jun 28, 2023 | 6:29 PM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर दिली होती. "राष्ट्रवादीत अन्याय होतोय तर छगन भुजबळ यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे," असं रामदास आठवले म्हणाले. दरम्यान या ऑफरवर छगन भुजबळ यांनी प्रति्क्रिया दिली आहे.

नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर दिली होती. “राष्ट्रवादीत फक्त मराठा समाजालाच जास्त पदं दिले जात आहेत ही रास्त भूमिका आहे. कारण छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यामागे ताकदीने उभे राहिले आहेत. त्यांना जर वाटत असेल की आपल्यावर राष्ट्रवादीत अन्याय होतोय तर त्यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे,” असं रामदास आठवले म्हणाले. दरम्यान या ऑफरवर छगन भुजबळ यांनी प्रति्क्रिया दिली आहे. “रामदास आठवले यांनी मला जे आमंत्रण दिले त्याबद्दल आभारी आहे. मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या पक्षात गेलो तर कोणतं पद मला मिळणार यावर चर्चा करणार,” असा टोला भुजबळांनी लगावला आहे.

Published on: Jun 28, 2023 06:29 PM