Sambhajinagar News : आजी-आजोबाच्या निखळ प्रेमाचा व्हिडीओ; ज्वेलरने टीव्ही9वर व्यक्त केल्या भावना

Sambhajinagar News : आजी-आजोबाच्या निखळ प्रेमाचा व्हिडीओ; ज्वेलरने टीव्ही9वर व्यक्त केल्या भावना

| Updated on: Jun 17, 2025 | 12:04 PM

Sambhajinagar Viral Video : छत्रपती संभाजीनगरमधील वृद्ध दाम्पत्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर व्हिडीओ बनवणाऱ्या दुकानदराने भावना व्यक्त केल्या आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. मण्याची पोत आणि डोरलं खरेदीसाठी गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदाराने त्यांना डोरलं आणि एक मण्याची पोत भेट म्हणून दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

संभाजीनगरमध्ये असलेल्या एका दागिन्याच्या दुकानाततला एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. 1 ग्रॅम सोनं आणि इतर सध्या दागिन्यांचं हे दुकान असून यात आपल्या वृद्ध पत्नीला घेऊन गळ्यातली 1 ग्रॅम सोन्याची पोत घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रेमाचा अनुभव या व्हिडीओमध्ये येतो. वृद्ध पत्नीची हौस पूर्ण करण्यासाठी या आजोबांनी जमा करून आणलेले सर्व पैसे ते दुकानदाराला देताना दिसून येत आहे. मात्र या दाम्पत्याचं या वयातही एकमेकांवर असलेलं प्रेम आणि जीव पाहून दुकानदाराने देखील पैसे नको आशीर्वाद द्या म्हणत एक डोरलं आणि मण्याची पोत या दाम्पत्याला भेट म्हणून दिलेली आहे. त्यामुळे या आजी-आजोबाच्या प्रेमाबरोबरच दुकानदाराच्या माणुसकीचं देखील चांगलंच कौतुक सध्या नेटकऱ्यांकडून केलं जात आहे.

Published on: Jun 17, 2025 11:57 AM