राडा करणारी मुलं नशेडी, आपल्यावरही हल्ला चढवला; जलील यांचा खुलासा

राडा करणारी मुलं नशेडी, आपल्यावरही हल्ला चढवला; जलील यांचा खुलासा

| Updated on: Mar 30, 2023 | 2:52 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट भाजप आणि एमआयएमवर हल्ला चढवला. तसेच या राड्यामागे भाजप एमआयएमचा खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा अरोप केला होता

छत्रपती संभाजीनगर : येथील किऱ्हाडपुर भागातील राम मंदिर परिसरात जोरदार राडा झाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट भाजप आणि एमआयएमवर हल्ला चढवला. तसेच या राड्यामागे भाजप एमआयएमचा खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा अरोप केला होता. त्यावर खासदार जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मला या अरोपांवर काहीही अता बोलायचं नाही. आता लोकांना शांत करणं ही महत्वाची बाब आहे. तर यात कोणाचे हात आहेत हे सरकारनं तपासावं अस म्हटलं आहे. त्याचबरोबर खासदार जलील यांनी या राड्यात आपण फक्त राम मंदिराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून तेथे गेल्याचे सांगितले. यावेळी तेथे दंगा करणारी, जाळपोळ करणारी मुलं ही काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्यांनी नशा केला होता. ती नशेडी होती. ती कोणाच्याच कंट्रोलमध्ये नव्हते. माझ्यावरही त्यांनी हल्ला चढवला असा खुलासा जलील यांनी केला आहे.

Published on: Mar 30, 2023 02:52 PM