Ambadas Danve on Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसमोर मुजरा करणारे नेते, अंबादास दानवे यांची बोचरी टीका
Ambadas Danve on Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसमोर मुजरा करणारे नेते असल्याची घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
Ambadas Danve on Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लीसमोर (Delhi) मजुरा करणारे नेते असल्याची घणाघाती टीका अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्यापासून, 30 जुलै पासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते सिल्लोडसह इतर भागात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसूख घेतले. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद रॅली (Shiv Samvad Rally) झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पायखालची वाळू सरकरली आहे. त्यामुळेच त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा नियोजीत दौरा सुरु केल्याची टीका यावेळी दानवे यांनी केली.
निष्ठा विकत मिळत नाही
निष्ठा ओढून ताणून मिळत नसते. निष्ठा विकत सु्द्धा मिळत नसते. शिंदे गटात सहभागी झालेले आमदार अब्दुल सत्तार यांना या नवीन सरकारमध्ये मंत्रीपद हवे आहे. त्यासाठी ते जीवाचे रान करत आहेत. मुख्यमंत्र्यासमोर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाडोत्री माणसे आणण्यात येणार असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
