Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी षणमुखानंद सभागृहात पोहोचले

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी षणमुखानंद सभागृहात पोहोचले

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:42 PM

शिवसेनेचा दसरा मेळावा आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी साडे सात ते आठ वाजता शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. यावर्षी हा मेळावा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

संपूर्ण भारतात आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. याआधी दुपारी भाजप नेत्या पंकडा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावरील दसरा मेळावा खूप गाजला. त्याआधी नागपुरात सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन पार पडलं. त्यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी साडे सात ते आठ वाजता शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. यावर्षी हा मेळावा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने शिवसैनिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभागृहाची क्षमता 2600 जागांची आहे. याचा अर्थ जवळपास 1300 शिवसैनिक सभागृहात उपस्थित राहतील. जवळपास दोन वर्षांनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात साजरा होतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.