Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पैशांसोबतच्या फोटोचा दाखला देत त्यांनी गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कमिशन घेतल्याचा संशय व्यक्त केला. कंत्राटदार आमदारांच्या कमिशनमुळे दबले असल्याची तक्रार करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यावर कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमदार गोगावले यांचा पैशांसोबतचा एक फोटो दाखवत चित्रलेखा पाटील यांनी हा दावा केला आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अनेक कंत्राटदार आमदारांच्या कमिशनमुळे दबले असून, त्यांना काम करणे कठीण झाले आहे. “हे कमिशनचे पैसे नाहीत ना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. आमदारांच्या प्रत्येक बँक खात्याची आणि संबंधित अधिकारी व लोकांची, विशेषतः मुरुडच्या सीओची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा व्हिडिओ त्यांनी माध्यमांना दाखवला आहे.
Published on: Dec 10, 2025 05:11 PM
