विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका आहे तरी कोण?
विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. लॉबीमध्येच ही हाणामारी झाली.
विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याच्यावर हल्ला केला. दरम्यान, सुरू असलेल्या हाणामारीत विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडत ही मारामारी थांबवली. या घटनेनंतर जयंत पाटील नितीन देशमुखांना भेटले तेव्हा त्याने गोपीचंद पडळकरांना मारण्याची भाषा केली.
विधानभवनात मारहाण करणारा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका आहे तरी कोण? ऋषिकेश टकले गोपीचंद पडळकरांच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष आहे. पलूस तालुक्यातला मैल पलूस इथला रहिवासी आहे. गोपीचंद पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता असून त्यांच्यासोबतच राहतो. तसंच ऋषिकेश टकलेवर मोक्का लागलेला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.
