Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाचा वाद पेटण्याची शक्यता

| Updated on: Jan 28, 2022 | 9:24 AM

शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झालाय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतलाय.

Follow us on

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झालाय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानेदेखील हीच भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला आहे.