Shivsena : गद्दार…बाहेर ये तुला दाखवतो, विधान परिषदेत खडाजंगी; शंभुराजे अनिल परबांवर संतापले अन्…

Shivsena : गद्दार…बाहेर ये तुला दाखवतो, विधान परिषदेत खडाजंगी; शंभुराजे अनिल परबांवर संतापले अन्…

| Updated on: Jul 10, 2025 | 4:54 PM

मुंबईत मराठी माणसाला घरं मिळालं पाहिजे या मुद्द्यावरून शंभुराजे अनिल परबांवर संतापले. सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांचा उल्लेख परबांनी गद्दार असा केल्यानंतर शंभूराज देसाई त्यांच्यावर संतापले.

विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटातील नेते अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मुंबईमध्ये मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजे, या मुद्द्यावरून विधान परिषदेत वादंग निर्माण झाला होता. शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, असं वक्तव्य अनिल परब यांनी सभागृहात केलं आणि विधान परिषदेत गद्दार या शब्दावरून खडाजंगी झाली. तर गद्दार कुणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांचा अनिल परबांवर संताप पाहायला मिळाला. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटातील नेते अनिल परब यांच्यातील वादानंतर सभागृह १० मिनिटांसाठी स्थगित करत कामकाज देखील तहकूब करण्यात आलं तर हे शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आलेत.

Published on: Jul 10, 2025 01:49 PM