Devendra Fadnavis :  सगळे आमदार माजले, शिव्या फक्त पडळकरला नाही तर… फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

Devendra Fadnavis : सगळे आमदार माजले, शिव्या फक्त पडळकरला नाही तर… फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

| Updated on: Jul 18, 2025 | 3:45 PM

राहुल नार्वेकर यांना आव्हाडांना शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्याचे समजले आहे. घटनांच्या पार्श्वभूमीवर नीतीमूल्य समितीची स्थापना करण्याचा विचार सुरू आहे.

विधानसभेत झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण चर्चेत आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घडलेल्या काही घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणाच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही? असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. जितेंद्र आव्हाडांना बोलू द्या, असं जयंत पाटील म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सवाल केलाय. तर मला सर्व गोष्टी दालनात येऊन सांगितल्या देल्या, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. दरम्यान, सभागृहात बोलत असताना मला धमकी आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ कऱण्यात आल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. यावेळी सभागृहात यावर बोलताना फडणवीस काहिसे भडकल्याचे पाहायला मिळाले. सगळे आमदार माजलेत, असं बाहेर बोललं जात असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे सगळ्याच आमदारांनी थोडासा संयम ठेवावा, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Published on: Jul 18, 2025 03:45 PM