Nashik Kumbhamela : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन समितीची बैठक घेतली आहे. यात 13 आखाड्याच्या महंतांची देखील उपस्थिती होती.
नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. या सर्वांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कुंभमेळ्याच्या आयोजनावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री शाही स्नानाच्या तारखा देखील जाहिर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या कुंभमेळा नियोजन समितीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. तर 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्वस्नान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 13 आखाड्याच्या महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात महत्वाची बैठक घेतली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत कुंभमेळाच्या नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत.
