Nashik Journalist Beating : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांना समजताच दिले महत्त्वाचे आदेश

Nashik Journalist Beating : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांना समजताच दिले महत्त्वाचे आदेश

| Updated on: Sep 20, 2025 | 5:29 PM

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अत्याचाराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर छगन भुजबळ यांनीही जखमींना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे चार ते पाच पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीची घटना समोर समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेत काही पत्रकारांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि या प्रकरणात दोषींना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना दिली. मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांनी दुखापत झालेल्या पत्रकारांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली. तर या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

Published on: Sep 20, 2025 05:29 PM