CM Fadnavis : महादेवी परत आली पाहिजे… हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्याचा पुढाकार; म्हणाले, पूर्ण ताकदीने….
तब्बल ३४ वर्षांपासून महादेवी उर्फ माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी हत्तीणीची निगा राखण्यासाठी रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतही सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मध्यस्थी करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकंच नाहीतर महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तर कोल्हापुरातील नांदणी मठाने महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात एक याचिका दाखल करावी, यासोबत सरकारही एक याचिका दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील नांदणी मठात महादेवी हत्तीण परत आली पाहिजे… ही सर्वांची इच्छा असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 05, 2025 04:24 PM
