Ashadi Ekadashi 2024 : विठ्ठल-रुख्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून पोषाख अर्पण, बघा नक्षीदार पैठणी अन्…
आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला पोषाख विठ्ठल-रुख्मिणीला परिधान केला जाणार आहे. सोवळे, अंगरखा, शेला आणि पैठणी हा पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आणून दिला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला पोषाख विठ्ठल-रुख्मिणीला परिधान केला जाणार आहे. सोवळे, अंगरखा, शेला आणि पैठणी हा पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आणून दिला. यानंतर जनतेच्या सेवेचे फळ म्हणून आपण पोषाखदेऊ शकलो, अशी भावना वृषाली शिंदे यांनी व्यक्त केली. तर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांचे आभार मानत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाला दिलेल्या पोषाखाचे वर्णन केले. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी टीव्ही ९ ने संवाद साधला आहे. एकादशीच्या निमित्ताने विशेष असणाऱ्या अंगरखा, सोवळे, शेला आणि रुक्मिणी मातेस साडी असा पांडुरंगाचा पोषाख आला आहे. कसा असणार विठोबाचा पोषाख बघा व्हिडीओ…
