मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण,  क्रेडाई एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, क्रेडाई एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

| Updated on: Feb 06, 2023 | 2:54 PM

ठाणे येथील रेमंड मैदानात एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

ठाणे : दरवर्षीप्रमाणे ठाणे येथील रेमंड मैदानात एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आले आहे. यंदा या एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचं २० वर्ष असून या एक्स्पोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी ते बांधकाम व्यावसायिक यांच्याशी संवाद साधत होते. आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करणाऱ्यांची रीघ लागली आहे, सहा महिन्यांत कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक राज्यात पुन्हा आणण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान, त्यांनी असेही सांगितले की, या एक्स्पोच्या माध्यमातून मध्यमवर्गीय नागरिकांचं घराचं स्वप्न होणार पूर्ण होणार आहे. बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांचे घर घ्यायचं स्वप्न असतं आणि अशा या एक्स्पोमधून ग्राहकांना घरं चॉईस करायची संधी मिळते. इतकंच नाही तर लोन देण्याची फॅसिलिटी एकाच ठिकाणी असल्याने ग्राहकांना फिरावे लागत नाही. विशेष म्हणजे ग्राहकांना परवडणारी घरे या एक्स्पोमध्ये मिळतात. त्यामुळे अशा एक्स्पोचा ग्राहकांना खूप फायदा असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Feb 06, 2023 02:54 PM