Shinde-Fadnavis : पद एकच मात्र आदेश दोन… फडणवीस अन् शिंदेंच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध? चर्चांना उधाण

Shinde-Fadnavis : पद एकच मात्र आदेश दोन… फडणवीस अन् शिंदेंच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध? चर्चांना उधाण

| Updated on: Aug 06, 2025 | 2:59 PM

मुंबई बेस्ट महाव्यवस्थापकाचा कारभार गेल्या ६ दिवसात तीन लोकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पाहायला मिळालंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 31/07/2025 रोजी श्रीनिवास यांच्याकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार होता. तर 05/08/2025 रोजी अश्विनी जोशी या सकाळपर्यंत त्यांचेकडे हा कारभार होता. मात्र 05/08/2025 दुपारी नंतर आशिष शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध रंगलं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण एकाच पदाकरता एकाच दिवशी दोन विभागाकडून दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आल्याचे पाहायला मिळालंय. बेस्टचा अतिरिक्त कार्यभार एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला तर फडणवीसांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली असल्याचे समोर आले.

दरम्यान, प्रशासनाकडून झालेल्या या सावळ्या गोंधळावरून विविध तर्क वितर्कांना आता उधाण आलं आहे. एकीकडे सामान्य प्रशासन विभागाकडून एक परिपत्रक काढलंय तर दुसरीकडे नगरविकास खात्याकडूनही एक परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यामुळे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार दोन व्यक्तींकडे सोपवल्याचे यावरून दिसतंय. याआधी बेस्टचे व्यवस्थापक म्हणून एकच व्यक्ती आपली जबाबदारी सांभाळत होता. मात्र आता बेस्टचा अतिरिक्त कार्यभार दोन व्यक्तींकडे देण्यात आल्याने चर्चा सुरू झाल्यात.

Published on: Aug 06, 2025 02:59 PM