Radio Mahotsav : आशा भोसलेंचा आग्रह, फडणवीसांनी गायलं अभी न जाओ छोडकर…, तर शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल; बघा VIDEO
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आज २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिल्या ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरजे सिद्धू (रेड एफएम), आरजे अक्की (मॅजिक एफएम), आरजे अर्चना (रेडिओसिटी), आरजे प्रेरणा (रेडिओ मिर्ची), आणि आरजे अभिलाष (बिग एफएम) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली.
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’चे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. यावेळी गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क गाणं गाण्याचा आग्रह केला. आशा भोसले यांनी बराच आग्रह केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभी न जाओ छोड कर के दिल अभी भरा नही हे गाणं गायलं… तर दुसरीकडे आशिष शेलार यांच्यावरही गाणं गाण्याची वेळ आली यावेळी त्यांनी चक्क बालगीत गायल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांची मस्करी केली. त्यानंतर शेलारांनी नाच रे मोरा हे गाणं गायलं….बघा व्हिडीओ
Published on: Jun 21, 2025 05:42 PM
