CM Fadnavis : आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा पप्पू! राहुल गांधींचा उल्लेख करत फडणवीसांचा निशाणा

CM Fadnavis : आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा पप्पू! राहुल गांधींचा उल्लेख करत फडणवीसांचा निशाणा

| Updated on: Oct 28, 2025 | 5:23 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे पॅनकार्ड दाखवल्याचा आरोप करत तीव्र टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये आणि महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, असा सल्ला फडणवीसांनी दिला. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये,” असे फडणवीस म्हणाले. कालच्या त्यांच्या प्रेझेंटेशनवर निशाणा साधत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. फडणवीसांच्या मते, आदित्य ठाकरे यांनी दाखवलेले पॅनकार्ड खोटे निघाले आहे. या खोट्या दस्तावेजाबद्दल आदित्य ठाकरे माफी मागणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आता त्यांनी दाखवलेले पॅन कार्ड खोटे निघाल्याने त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. या प्रकरणी पॅनकार्ड कोणी काढले, यावर एफआयआर (FIR) दाखल होण्याची शक्यता आहे. रोज खोटे डॉक्युमेंट तयार करून प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या सवयीवर त्यांनी टीका केली. राहुल गांधींनी मोठ्या स्क्रीनवर सादरीकरण करून “खोदा पहाड और चुहा भी नही निकला” असेच काहीसे आदित्य ठाकरेंनी काल केले, अशी उपमा फडणवीसांनी दिली.

Published on: Oct 28, 2025 05:23 PM