Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या फॉर्मवरील ‘त्या’ फोटोंवरून राजकारण, अर्जावर कोणत्या नेत्यांचे चेहरे

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या फॉर्मवरील ‘त्या’ फोटोंवरून राजकारण, अर्जावर कोणत्या नेत्यांचे चेहरे

| Updated on: Jul 05, 2024 | 12:36 PM

Ladki Bahin Yojana online Form 2024 : लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या योजनचा लाभ घेण्यासाठी महिलांना या योजनेचा ऑनलाईनही अर्ज उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या अर्जावर कोणत्या नेत्यांचे फोटो?

राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या योजनचा लाभ घेण्यासाठी महिलांना या योजनेचा ऑनलाईनही अर्ज उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो दिसताय. यासह आदिती तटकरे यांचादेखील फोटो अर्जावर आहे. ज्यावेळी राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली होती त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तर ही योजना अजित पवार, राष्ट्रवादी यांची आहे असं म्हटलं जात होतं मात्र ही योजना महायुतीच्या नेत्यांची आहे, असं दावा केला जात असताना या अर्जावर असणाऱ्या फोटोवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यांची अडचण होणार आहे. कारण या योजनेसाठी इतर पक्षातील नेतेही कॅम्प लावण्याची तयारी करत आहे.

Published on: Jul 05, 2024 12:30 PM