Vijay Wadettiwar : 4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, OSD च्या नावानं बीडच्या व्यक्तीकडून वसुली…वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ

| Updated on: Dec 13, 2025 | 12:01 PM

सोयाबीनच्या खरेदीवरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले. त्याचवेळी पणन मंत्र्यांच्या ओएसडीचं नाव सांगून चार चार लाख खरेदी केंद्रासाठी घेतले जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या ओएसडीवर सनसनाटी आरोप केलाय. सोयाबीन सेंटरच्या खरेदी केंद्राला मंजुरी देण्यासाठीच लाख रुपये मागितले जातात. रावल यांचे ओएसडी अभिजीत पाटील आणि गर्जे यां त्यांच्या नावानं बीडचा अखिल नावाचा व्यक्ती वसूली करत असल्याचा आरोप हा वडेट्टीवार यांनी केलाय. वडेट्टीवारांनी ज्या बीडच्या अखिल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला त्या अखिल काजीची प्रतिक्रिया टीव्ही ९ ने घेतली. तेव्हा आरोप फेटाळत वडेट्टीवारांना पुरावे देण्याच आव्हान देत अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं अखिल काझीनी म्हटलंय. सलग दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार सोयाबीनच्या खरेदीवरून आक्रमक झाले. चांगला सोयाबीनही नाकारला जात असून कोणत्या शेतकऱ्यांचा नाकारला त्याचा पुरावा वा दाखवण्यासाठी बडेट्टीवारांनी थेट सोयाबीनच विधानसभेत आणलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 13, 2025 12:01 PM