Vijay Vadettiwar : ‘रस्त्यावरचा सडकछाप…. त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले’, विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माधव भंडारी हे उपस्थित होते. त्यावेळी माधव भंडारी यांनी 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता, असा गंभीर आरोप केला.
भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता, असा खळबळजनक आरोप माधव भंडारी यांनी केलाय. दरम्यान, माधव भंडारी यांनी केलेल्या गंभीर आरोपावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रत्युत्तर दिलंय. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी माधव भंडारी यांचा उल्लेख सडकछाप असा केल्याचे पाहायला मिळाले. विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘एखाद्या रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आह?’, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. इतकंच नाहीतर एखाद्या राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे’, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जिव्हारी लागणारा पलटवार केलाय.
