काँग्रेसच्या काही मंत्र्यांवर आमदार नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार : सूत्र

काँग्रेसच्या काही मंत्र्यांवर आमदार नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार : सूत्र

| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 10:09 AM

राज्यात काँग्रेसच्याच काही मंत्र्यांवर काँग्रेस आमदारांची नाराजी वाढत असल्याची माहिती आहे. राज्यातील काही मंत्र्यांवर नाराज असलेले काँग्रेस आमदार दिल्लीत हायकमांडची भेट घेणार आहेत.

राज्यात काँग्रेसच्याच काही मंत्र्यांवर काँग्रेस आमदारांची नाराजी वाढत असल्याची माहिती आहे. राज्यातील काही मंत्र्यांवर नाराज असलेले काँग्रेस आमदार दिल्लीत हायकमांडची भेट घेणार आहेत. सात ते आठ नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  दिल्लीत हायकमांडशी भेटून खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांची तक्रार करण्यात येणार आहे.  ‘टीव्ही 9 मराठी’ला  यासंदर्भात खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.  पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. आमदारांनी  राहूल गांधी यांच्या भेटीचीही मागितल्याचं  कळतंय. 10 दिवसांपूर्वी विदर्भातल्या नाराज काँग्रेस आमदाराने दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची तक्रार केली होती.