… तेव्हा देशाची बदनामी होत नाही का? नाना पटेलेंचा हल्लाबोल

… तेव्हा देशाची बदनामी होत नाही का? नाना पटेलेंचा हल्लाबोल

| Updated on: Mar 16, 2023 | 8:26 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना, देश म्हणजे फक्त मोदी हे समिकरण झालं आहे. हे बरोबर नाही

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत बाहेरच्या देशांकडे मदत मागतात. त्यामुळे आपल्या देशाची बदनामी होते अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना, देश म्हणजे फक्त मोदी हे समिकरण झालं आहे. हे बरोबर नाही. मोदींमध्ये अहम आणि गर्व आलेला आहे. जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशमध्ये जातात त्यावेळेस त्यांच्याबद्दलचं काय मत झालेलं आहे हे देशाने पाहिलं आहे. एका फिल्ममुळे जर बीबीसी सारख्या माध्यमावर छापेमारी होते. त्यामुळे देशाची बदनामी होत नाही का? सध्या देशाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीन अरुणाचल आणि लद्दाखमधील गावांवर कब्जा करतो त्याची चर्चा का हे भाजपवाले करत नाहीत असा सवाल देखील पटोले यांनी केला.

Published on: Mar 16, 2023 08:26 AM