Varsha Gaikwad Video : ‘नितेश राणेंना महाराष्ट्र जाळायचा आहे का?’, महिला खासादारानं थेट सवाल करत झापलं

Varsha Gaikwad Video : ‘नितेश राणेंना महाराष्ट्र जाळायचा आहे का?’, महिला खासादारानं थेट सवाल करत झापलं

| Updated on: Mar 18, 2025 | 2:52 PM

सध्या नागपूरमध्ये पोलिसांनी 144 कलम लागू केलं असल्यामुळे तणावपूर्ण शांतता संपूर्ण नागपूरमध्ये आहे. दरम्यान 50 पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

नागपूर येथील महाल परिसरात काल तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.  या राड्यात दोन गट समोरा-समोर आले त्यानंतर त्याच्यातील वाद चांगलाच पेटला. शहरातील तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर शहरात काही भागात संचारबंदी लागू कऱणयात आली आहे. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. अशातच ‘शांतता आणि सद्भावनेचं वातावरण ठेवावं’, असं आवाहन काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी नागपूर आणि महाराष्ट्रातील जनतेला केलं. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित प्रगत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला समाजसुधारक, महापुरूषांचा असा खूप मोठा इतिहास आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण कोणतंही वक्तव्य करत असून त्यावेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि ते अठरा पगड जातीला घेऊन पुढे जाणारे होते. जाती-धर्मात सौख्य राहून सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम शिवरायांनी केलं, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. तर याच शिवरायांबद्दल कोणतं तरी वक्तव्य करून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना एक सांगणं आहे की, राजकारण आणि धर्म हे वेगवेगळे असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्टच म्हटले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी नितेश राणेंना थेट सवाल करत झापल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 18, 2025 02:52 PM